
हरित महाराष्ट्र: ११ वर्षांत विक्रमी झेप
महाराष्ट्रात गेल्या ११ वर्षांत (२०१४ ते २०२६) २०१५-१६ ते २०२१-२२ या काळात वन आणि वृक्ष आच्छादित जमिनीचे क्षेत्रफळ ९,८३१ चौरस किलोमीटरवरून १४,५२५ चौरस किलोमीटरपर्यंत वाढले आहे असे केंद्र सरकारच्या अहवालांमधून निदर्शनास आले आहे. याचा अर्थ, राज्यातील हरित क्षेत्रात सुमारे ४७.७ टक्के वाढ झाली आहे.! आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा यांसारख्या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राने सर्वाधिक वाढ नोंदवली आहे. या अहवालांनुसार, हरित क्षेत्राच्या आकाराच्या संदर्भात महाराष्ट्र देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. २०२१-२२ सालच्या आकडेवारीनुसार, राज्यातील वने आणि वृक्ष आच्छादित जमिनींचे एकूण क्षेत्रफळ ६५,३८३ चौरस किलोमीटर असून, त्यापैकी ५०,८५८ चौरस किलोमीटर जमिन जंगल क्षेत्रात आहे. हे क्षेत्र राज्यातील एकूण जमिनीच्या १६.५३ टक्के एवढे आहे.
महत्वाचे म्हणजे हे आकडे केवळ कागदावरचे आराखडे नाहीत, तर उपग्रह चित्रे, क्षेत्रीय तपासणी आणि राष्ट्रीय वन सर्वेक्षण इत्यादी अनेक पद्धतींनी केलेल्या प्रत्यक्ष तपासणी यावर आधारित आहेत. महाराष्ट्राच्या हरित आच्छादनात घडून आलेली ही वाढ मुख्यतः देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार आणि २०२२ नंतर महायुती सरकारच्या सातत्यपूर्ण योजनांमुळे शक्य झाली आहे असे ठामपणे म्हणता येते.
वर दिलेले आकडे Envistats India 2025 आणि India State of Forest Report (ISFR) 2023 या दोन अधिकृत अहवालांवर आधारित आहेत. हे दोन्ही अहवाल केंद्र सरकारचे आहेत. उपग्रह इमेजेस आणि भारतीय वन सर्वेक्षण (National Forest Inventory) कडील उपलब्ध आकडेवारीचा अभ्यास आणि प्रत्यक्ष जमिनीवरील पडताळणी करून त्यातील माहिती संकलित केली जाते. त्यामुळे ते पर्यावरण धोरणे, बजेट आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील अभ्यासासाठी विश्वासार्ह मानले जातात. या अहवालानुसार देशात सर्वाधिक क्षेत्रावर वृक्ष आच्छादन महाराष्ट्रात असून, त्यात शेती वगळता अन्य झाडे, रस्त्याकडेची झाडे आणि शहरी हरित क्षेत्र यांचाही यात समावेश आहे.
२०१४ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा आर्थिक, औद्योगिक, दळणवळण विकास साधण्यासोबतच हरित महाराष्ट्र अभियान सुरू केले. २०१६ पासून चार वर्षांत ५० कोटी रोपे लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. विशेष उल्लेखनीय बाब अशी की, वन विभाग आणि स्थानिक संस्थांच्या प्रयत्नांनी २०१६-१९ पर्यंत ५२ कोटींहून अधिक रोपे लावली गेली. यातील अनेक रोपे शेतकऱ्यांच्या शेतात, रस्त्यांच्या कडेला आणि गावोगावी मोकळे माळ, डोंगरउतार अश्या विविध ठिकाणी लावली गेली. या रोपांचा जगण्याचा दर ८१ टक्क्यांहून अधिक नोंदवला गेला आहे. यामागेही सरकाराची दूरदृष्टी आहे. चांगली वाढ झालेली २ वर्षांची, सशक्त रोपे निवडणे, वृक्षारोपणात लोकांना सहभागी करून घेणे, रोपांच्या देखभालीसाठी अतिशय काटेकोर नियोजन करणे असे सरकारचे अनेक दूरदृष्टीचे निर्णय या यशामागे आहेत.
Sources: