
हा फरक असतो Natural Buzz आणि Artificial Buzz मध्ये...
Source: Sacnilk

Source: Sacnilk
खूप वर्षापूर्वी हा चित्रपट पाहिला होता. अतिशय सरप्रायझिंग चित्रपट होता, पण यावर कधी चर्चा होताना दिसली नाही, तुम्ही हा चित्रपट पाहिला आहे का ?
राजा शिवाजी ची सुरुवात दमदार झाली होती आणि मराठीमध्ये अजूनही कलेक्शन ठीकठाक स्टेबल आहेत, म्हणजे प्रत्येक दिवसा वाईज कमी तर होत आहेत, जर सैराटला क्रॉस करायचं असेल तर अजून दोन आठवडे स्टेबल कलेक्शन द्यावे लागेल, शक्य वाटतय का ?
मित्रांनो राजा शिवाजीचा शो पाहून बाहेर आलोय आणि जे मला वाटतंय ते मी डायरेक्ट लिहितोय खूप लांबट लिहायचा कंटाळा आलाय शॉर्टकट मध्ये लिहितो.
चांगल्या गोष्टी :
टीझर आणि ट्रेलर पाहून खूप कमी एक्स्पेक्टेशन केल्या होत्या मात्र चित्रपट ठीकठाक आहे.
बॅकग्राऊंड म्युझिक दमदार आहे.
बऱ्यापैकी चित्रपट एंगेजिंग आहे.
संजय दत्तचं काम ठीकठाक आहे आणि बाकी मराठी कलाकारांनी आपापली काम मस्त केली आहेत.
न पटलेल्या गोष्टी :
चित्रपट अतिशय लाऊड आणि मेलोड्रामेटीक आहे.
मेकअप, सेट डिझायनिंग किंवा आर्ट डिरेक्शन खूपच नकली आणि सिरीयल सारखं वाटलं.
vfx बद्दल तर न बोललेलं बरं त्यांनी ट्रेलर मधील बरेचसे शॉट चित्रपटातून वगळले आहेत असं वाटलं पण तरीसुद्धा vfx अतिशय सिरीयल दर्जाचा झाला आहे. प्राण्यांचे सीन तर अगदी एआय न बनवलेले व्हिडिओ त्यापेक्षा बरे असतात.
अभिषेक बच्चन आणि जेनेलियाला अजिबात मराठी बोलता आलं नाही, त्यामुळे ते कॅरेक्टर मध्ये उतरू शकले नाहीत.
रितेशने शिवरायांचे कॅरेक्टर पेलण्याचा खूप प्रयत्न केलेला दिसतोय मात्र दुर्दैवाने तो अजिबात सूट झाला नाही.
ओव्हरऑल चित्रपट खूप वाईट झालाय असं नाही मात्र एक avarage चित्रपट आहे असं म्हणता येईल. सामान्य प्रेक्षक आणि लहान मुलांना कदाचित आवडू शकतो, मात्र ज्यांना चित्रपट म्हणून बघायचं आहे त्यांना तेवढा जास्त चित्रपट आवडेल असं वाटत नाही. आता हे माझं मत आहे काही लोकांना हा चित्रपट आवडू सुद्धा शकतो.