
▲ 40 r/pune
माझ्या जागी तुम्ही असता तर काय केलं असतं?
पाहुण्यांकडे गेल्यावर किंवा पाहुणे घरी आल्यावर खाण्याचा आग्रह का करतात समजत नाही. गुलाबजाम, रसमलाई, नमकीन, खारट-तुरट आणि तळलेले पदार्थ खाण्याचा एवढा अट्टाहास कशासाठी?
आग्रह करायचाच आहे तर गाजर, काकडी, सलाडचा का नाही? गोड, तेलकट आणि खारट पदार्थ तब्येतीसाठी चांगले नाहीत हे माहित असूनही आणखी खा म्हणून का त्रास द्यायचा? मला वाटतं माझी तब्येत चांगली आहे हे त्यांना बघवत नसावं.
तुमचं एवढं प्रेम आहे तर मला गिफ्ट व्हाउचर द्या. मला वाचनाची आवड आहे. एखादं पुस्तक घेऊन वाचेन.
u/newbie-nothing — 1 day ago