
काल ठकीशी संवाद या मराठी नाटका चा अंतिम प्रयोग झाला.
नाटकाची पार्श्वभूमी: - ठकिशी संवाद हे मराठी मध्यमवर्गीय बुद्धिजीवीच्या “भूमिकाहीनते”वरचं अत्यंत धारदार black humour आहे.
ठकीशी संवाद नाटक हे ब्लॅक ह्यूमर प्रकारातील आहे आणि त्याचा मूळ गाभा राजकीय आणि त्यावर आधारित माणसाची काही भूमिका असावी की नसावी याच्याशी आहे. हे नाटक पूर्ण कळण्यासाठी तुम्हाला राम गणेश गडकरी कोण होते , त्यांचा पुतळा का फोडला, फोडणाऱ्याचा कोणी सत्कार केला? विजय तेंडुलकर आणि बाकी नाटककार ज्यांची नावे घेतली आहेत त्यांची किमान पार्श्वभूमी माहिती असण गरजेच आहे.
त्यानंतर भारतात ज्या काही प्रमुख राजकीय घटना घडल्या त्याची थोडीफार माहिती हवी जशी की नेहरू युग, आणीबाणी, बाबरी मशीद, संघ, कारखाने,2014 मोदी लाट, अर्बन नक्षल इत्यादी. एवढ सगळ होत असताना कोणती भूमिका न घेता, सगळ्या गोष्टींना मान हलवत हो म्हणनारा म्हातारा हे प्रमुख पात्र आहे . म्हातारा
नाटकातील हा वाईट माणूस नाही, पण तो सतत:
सगळ्यांचं ऐकतो,
प्रत्येक बाजू समजून घेतो,
कुणालाही दुखवू इच्छित नाही,
पण शेवटी कोणतीच ठाम भूमिका घेत नाही.
म्हणून ठकीचा प्रश्न फार महत्त्वाचा ठरतो:
“माणसाने स्वतःची भूमिका असावी की नसावी?”
आणि इथेच “करगोटा” येतो.
करगोटा म्हणजे फक्त surveillance नाही; तो “बांधलेलं मन” आहे.
माणूस इतका गुंततो:
इतिहासात,
विचारसरणीत,
राजकीय भीतीत,
सांस्कृतिक guilt मध्ये,
सामाजिक प्रतिमेत,
की शेवटी त्याचा स्वतःचा आवाजच हरवतो.
करगोटा ईथे सर्व घटना एकत्रीत बांधण्या साठी महत्वाचा आहे. तुम्ही काही ब्लॉक ह्यूमर वाले चित्रपट पाहिले असशील जसे की दिल्ली बेली त्यात पॉट (ज्यात हिरे/टटी) असते ते सर्व स्टोरी लाँ एकत्रित बांधतो तसच येते कारगोटा राम गणेश गडकरी ते आताचा चालू काळ यांना बांधून ठेवतो. नाटकाची स्टोरी भरकटू देत नाही तर सर्व अंग सांगून जातो. आता नाटकाचे प्रयोग होणार नाहीत त्यामुळे ते पुस्तक रुपात असेल तर वाचून आनंद घ्या.