u/Gam3r007

पहिल्यांदाच नाटक पाहिलं आणि तेही बालगंधर्व नाट्यगृह मध्ये!
🔥 Hot ▲ 139 r/pune

पहिल्यांदाच नाटक पाहिलं आणि तेही बालगंधर्व नाट्यगृह मध्ये!

गुरवारी नाटक बघायला गेलो आणि अनुभव खरंच भन्नाट होता म्हणून इथे शेअर करतोय!

मी पहिल्यांदाच आयुष्यात नाटक पाहायला गेलो आणि तेही थेट बालगंधर्व नाट्यगृह मध्ये. Honestly, expectations काय ठेवाव्यात तेच कळत नव्हतं, पण जे काही पाहिलं ते जबरदस्त होतं!

नाटक सुरू होताच एक वेगळंच वातावरण जाणवलं लाईव्ह परफॉर्मन्सची energy, प्रेक्षकांची reactions, आणि stage वरची detailing… सगळंच next level वाटलं. स्क्रीनवर काहीतरी पाहण्यापेक्षा live नाटक किती engaging असू शकतं, हे तेव्हा कळलं.

आणि प्रशांत दामले यांच्या बद्दल काय सांगू!

त्यांची timing, expressions, comedy… literally full paisa vasool! प्रत्येक dialogue ला प्रेक्षकांकडून इतका response येत होता की atmosphere अजूनच electric झाला होता. असा live connect OTT किंवा cinema मध्ये rarely feel होतो.

सगळ्यात जास्त आवडलं ते म्हणजे simplicity + talent. कोणतेही heavy VFX नाहीत, fancy edits नाहीत… फक्त pure acting आणि story आणि तरीही 2-3 तास कसे गेले कळलंच नाही.

आता खरंच वाटतंय की हे आधी का नाही explore केलं! Pune मध्ये इतकी heavy theatre culture आहे आणि आपणच miss करत होतो.

आता रिकमेंडेशन्स हवी आहेत

पुढच्या काही दिवसांत कोणती मराठी नाटके पाहायला जावीत?

कॉमेडी , इमोशनल , एक्सपेरिमेंटल काहीही चालेल

u/Gam3r007 — 20 hours ago